Ganeshotsav 2022: गणेशोत्सवानिमित्त मध्यरात्री देखील पश्चिम, हार्बर आणि मध्य मार्गावर विशेष लोकल धावणार, रेल्वे प्रशासनाची माहिती
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबरला मध्यरात्री विशेष लोकल चालवण्याची तयारी सुरू केली आहे.
गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) म्हणटलं की उत्साहचं. विशेष म्हणजे मुंबईतील गणेशोत्सव (Mumbai Ganeshotsav) अनोखाचं. मुंबईतील गणेशोत्सवासाठी केवळ देशभरातून नाही तर परदेशातूनही बाप्पाचे भक्त मुंबईत (Mumbai) हजेरी लावतात. दरम्यान मुंबईत मोठी गर्दी असते. मुंबईतील विविध भागात सार्वजनिक मंडळाकडून गणेशाची स्थापना केली जाते. बाप्पाच्या चर्णी नतमस्तक होण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना दिसतात. तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर मुंबई लोकलसंबंधी रेल्वे प्रशासनाकडून विशेष निर्णय घेण्यात आला आहे. मध्य (Centra Railway), हार्बर (Harbour Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) अशा तिन्ही मार्गावर मध्यरात्री देखील रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
तरी मध्यरात्री लोकल रेल्वे फक्त अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबरला मध्यरात्री विशेष लोकल (Midnight Special Local) चालवण्याची तयारी सुरू केली आहे. उत्सवकाळातील गर्दीमुळे गणरायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही, असे भाविक विसर्जनाच्या दिवशी दर्शन घेण्याचे नियोजन करतात. दादर (Dadar), गिरगाव (Girgaon) चौपाटीवर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखो नागरिक येतात. या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट (Churchgate) ते विरारदरम्यान (Virar) लोकल फेऱ्या असतील. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण (Kalyan), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल (Panvel) दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा या विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. (हे ही वाचा:- Ganesh Chaturthi 2022: जाणून घ्या गणपती स्थापनेचा मुहूर्त, ‘या’ वेळात करा बाप्पाची प्रतिष्ठापना)
येत्या काही दिवसांत अतिरिक्त लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरी मध्य आणि पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या (Ganpati Visarjan) पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबरला मध्यरात्री विशेष लोकल चालवण्याची तयारी सुरू केली आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय मुंबईसह उपनगरातील नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.