पुणे : शिवजयंती 2019 चा मुहूर्त साधत संभाजी उद्यान येथे तरूणाने बसवला संभाजी महाराजांचा पुतळा, पालिकेने पुतळा हटवल्यास महाराष्ट्र पेटेल असा इशारा

यंदा शिवजयंतीचा मुहूर्त साधत खेड (khed) येथील गणेश कारले (Ganesh Karle) या तरूणाने संभाजी उद्यानामध्ये (Sambhaji Udyan) छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Sambhaji Maharaj Statue) बसवला

Ganesh Karle (Photo credits: Facebook/Ganesh Karle )

19 फेब्रुवारी हा दिवस शिवजयंती (Shiv Jayanti) म्हणून साजरा केला जातो. यंदा शिवजयंतीचा मुहूर्त साधत खेड (khed) येथील गणेश कारले (Ganesh Karle) या तरूणाने संभाजी उद्यानामध्ये (Sambhaji Udyan) छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Sambhaji Maharaj Statue) बसवला. आज सकाळी अचानक हा प्रकार समोर आल्याने शहरात पोलिसांचीदेखील धावपळ झाली. मागील अनेक वर्षांपासून संभाजी उद्यान्यात संभाजींचा पुतळा बसवावा यासाठी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

संभाजी महाराजांची ओळख असलेल्या या उद्यान्यात संभाजी महराजांचा पुतळा असावा या मागणीला राष्ट्रवादी कॉंग्रेस, त्यापाठोपाठ भाजपाच्या सत्ताधार्‍यांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे अखेर खेडच्या एका तरूणाने पुढाकार घेत संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. गणेश कारले हा तरूण स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर त्याने खाली एक खास  कागद चिकटवला होता.  यामध्ये जर संभाजी महाराजांचा पुतळा हटवला किंवा तसा प्रयत्न झाला तर महाराष्ट्र पेटेल संदेश लिहला आहे.

संभाजी ब्रिगेडने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मागील 8 वर्षांपासून हा प्रयत्न केला जात होता मात्र राजकीय पक्ष त्यामध्ये रस दाखवत नसल्याने ज्या तरूणाने हे धाडस केले त्याचे कौतुक असल्याची भावना जिल्हाध्याक्ष संतोष शिंदे यांनी म्हटले आहे. महापालिकेनेही या पुतळ्याला अधिकृत करून कायमस्वरूपी परवानगी द्यावी असा इशारा दिल्याचे वृत्त एका वृत्तपत्रकाशी बोलताना संभाजी ब्रिगेडने दिले आहे. पोलिसांनी हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुतळा हटवला आहे.  काही वर्षांपूर्वी या उद्यानातून राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याचीदेखील काढून टाकण्यात आला होता.