New Parliamentary Leader Of Shiv Sena: संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवत शिवसेनेकडून गजानन किर्तीकर यांची नियुक्ती
आज महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या खासदारांनी कीर्तीकरांच्या नियुक्तीचं स्वागत केलं आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांना हटवून आता ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची नितुक्ती करण्यात आली आहे. आज याबाबतचे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात आल्याची माहिती शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. काही नेमणूका बदलण्यात आल्या. यामध्ये आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संसदीय नेतेपदावर गजानन किर्तीकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
ओम बिर्ला, लोकसभा अध्यक्ष यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये 21 फेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेनेची कार्यकारणीची बैठक झाली. त्यामध्ये एकमताने शिवसेना पक्षाच्या संसदेतील मुख्य पदावर संजय राऊत यांच्याऐवजी आता गजानन कीर्तीकर यांची नेमणूक होत असल्याचा ठराव संमत झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
संसदेत शिवसेनेकडून व्हिप काढण्याचा अधिकार आता नेमणूकीमुळे गजानन कीर्तीकर यांच्याकडे येणार आहे. आज महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या खासदारांनी कीर्तीकरांच्या नियुक्तीचं स्वागत केलं आहे. त्यांची भेट देखील त्यांनी घेतली आहे. लोकसभेतील 18 पैकी 13 खासदारही शिंदे गटात आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान शिवसेनेतील घडामोडींनंतर गजानन कीर्तीकर हे 11 नोव्हेंबरला शिंदे गटाकडे आले आहेत. मात्र त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरेंसोबत आहे. युवासेना पासून तो आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय म्हणून काम करत आहे. काही दिवसांपूर्वी खेडमध्ये मध्ये बोलताना पवारशाही, उद्धवशाही संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे.