Fuel Rates in Maharashtra Today: पेट्रोलचे दर अडीच रूपयांपेक्षा अधिक किंमतीने घसरले; जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक शहरातील Petrol-Diesel च्या किंमती!

ANI Tweet च्या माहितीनुसार, पेट्रोलच्या किंमतींमध्ये 2.69 रूपयांची तर डिझेलच्या किंमतीमध्ये 2.33 रूपायांची घसरण झाली आहे.

Petrol Pump (Photo Credits: IANS)

Petrol and Diesel Rates In Maharashtra:  आज (11 मार्च) सलग सातव्या दिवशी भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होताना पहायला मिळाली आहे. ANI Tweet च्या माहितीनुसार, पेट्रोलच्या किंमतींमध्ये 2.69 रूपयांची तर डिझेलच्या किंमतीमध्ये 2.33 रूपायांची घसरण झाली आहे. त्यामुळे सामान्यांसाठी सध्या सातत्याने होणारी इंधनाच्या दरातील घसरण ही दिलासादायक बाब आहे. सध्या सौदी आरेबिया आणि रशिया मध्ये तेलाच्या किंमतींवरून दरायुद्ध सुरू आहे. दरम्यान त्याचा परिणाम हा भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही पहायला मिळाला आहे. 1991 नंतर इंधनाच्या दरात होणारी ही घसरण मोठी समजली जात आहे. सध्या मुंबई, पुण्यामध्ये पेट्रोलचा दर हा 75-76 रूपयांच्या आसपास आहे. तर डिझेलचा दर हा 65 रूपयांच्या आसपास आहे.

सर्वसाधारणपणे दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर केल्या नंतर त्यानंतर नवे दर लागू होतात. दरम्यान यामध्ये जाहीर केलेल्या दरांमध्ये एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टींचे दर जोडले जातात. त्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर दुप्पट होतात. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक सह देशभरात विविध दर असतात.

जाणून महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल, डिझेलचे दर काय?

मुंबई - 75.99 (पेट्रोल दर), 65.97 (डिझेल दर)

पुणे - 76 (पेट्रोल दर),  64.97 (डिझेल दर)

नाशिक- 76.33 (पेट्रोल दर),  65.56 (डिझेल दर)

नागपूर- 76.13 (पेट्रोल दर),  65.12 (डिझेल दर)

कोल्हापूर- 76.47 (पेट्रोल दर),   65.44 (डिझेल दर)

दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2020-21 मध्ये इंधनावरील व्हॅटमध्ये 1 रूपयांची वाढ जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील इतर देशातील राज्यातील दरांच्या तुलनेत ते थोडे चढे असण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्लीमध्ये आजचा पेट्रोलचा दर 70.29 रूपये तर डिझेलचा दर 63.01 इतका आहे.