Rashid Shaikh Passes Away: माजी आमदार शेख रशीद यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
ते 65 वर्षांचे होते. मालेगाव ((Malegaon) ) विधानसभा मतदारसंघातील लोकप्रीय आमदार अशी त्यांची ओळख होती.
प्रदीर्घ काळ राज्य विधिमंडळाचे सदस्य राहिलेल विधानसभेचे माजी सदस्य रशीद शेख (Former MLA Rashid Shaikh) यांचे निधन झाले आहे. ते 65 वर्षांचे होते. मालेगाव ((Malegaon) ) विधानसभा मतदारसंघातील लोकप्रीय आमदार अशी त्यांची ओळख होती. सोमवारी (4 डिसेंबर) रात्री आकरा वाजता त्यांचे निधन (Rashid Shaikh Passes Away) झाले. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासाठी त्यांना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना नाशिक (Nashik News) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मालेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा विधानसभेवर प्रतिनिधित्व केले. विधानसभा निवडणूक 1999 मध्ये त्यांनी मिळवलेला विजय अतिशय धक्कादायक आणि चर्चेत राहिला होता. या निवडणुकीत त्यांनी निहाल अहमत यांचा धक्कादायरित्या पराभव केला होता. जे पाठिमागील 25 वर्षांपासून आमदार होते. जिल्ह्याच्या राजकारणात हा विजय आणि पराजय पुढचे प्रदीर्घ काळ चर्चेत होता. (हेही वाचा, Babanrao Dhakne Passed Away: माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
रशीद शेख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत विविध भूमिका आणि पदे भूषवली होती. ते मालेगाव महानगर पालिकेचे महापौर राहिले होते. त्यांनी अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तत्पूर्वी ते काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्षही होते. काँग्रेस पक्षामध्ये असलेल्या विविध समस्या आणि नेत्यांची, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उदासिनता आदींना कंटाळून त्यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
रशीद शेख यांचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार राहिल्यांनंतर 2017 मध्ये ते पुन्हा नगरसवेक झाले होते. त्या आधी 1994 मध्ये त्यांनी नगराध्यक्ष पदही भूषवले होते. शिवाय तीन वेळा ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. शहरातील कै. खलील दादा यांचे घर गल्ली नं. एक हजार खोली येथून आज सकाळी अंत्ययात्रेस प्रारंभ होणार आहे. त्यांच्यावर आयेशा नगर कब्रस्तान येथे सकाळी 11 वाजता दफनविधी केला जाईल. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळावू, उत्साही आणि लोकांचा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
रशीद शेख हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावाण आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जात. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला जोरदार झटका बसल्याचे मानले जात होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड झाल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाल्याची चर्चा नाशिक आणि मालेगावच्या राजकारणात रंगली आहे.