Sawantwadi Crime: सावंतवाडीत विदेशी महिलेला घनदाट जंगलात ठेवलं बांधून; 3 दिवसांनी पोलिसांकडून सुटका
दरम्यान याबाबत पोलिसांना कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली.
सिंधुदुर्गात एक धक्कादायक घटना घडली आहे. सावंतवाडी रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीच्या घनदाट जंगलात विदेशी महिलेला लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. दोन तीन दिवस बांधून ठेवल्यामुळे तीची प्रकृतीही खालावली आहे. दरम्यान आज शेकऱ्यांना ओरडण्याचा आवाज आल्यामुळे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी महिलेची सुटका केली आहे. आज सकाळी सोनुर्ली येथील गुराखी व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. घनदाट जंगलात या महीलेला दोन ते तीन दिवस बांधून ठेवल्याचे बोलल जात आहे. (हेही वाचा - Mumbai Local Stunt Viral Video: मुंबई लोकलमध्ये स्टंट करणे पडले महागात; तरुणाने एक पाय आणि हात गमावला, मध्य रेल्वेने केलं ‘हे’ आवाहन )
पाहा पोस्ट -
या भागात गेलेल्या शेतकरी व गुराख्यांना कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. दरम्यान याबाबत पोलिसांना कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली. दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसतांना एवढ्या आतमध्ये तिला कसे व कोणी आणले हा प्रश्न आता पोलिसांच्या समोर उभा राहिला आहे.
गोव्याला लागूनच सिंधुदुर्ग आहे या भागाचंही विदेशी पर्यटकांना आकर्षण असतं. त्यामुळे पर्यटक या भागातही येत असतात. मात्र हल्ली विदेशी पर्यटकांवर हल्ले वाढले आहेत. गोव्यातही काही घटना घडल्या आहेत. सध्या या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. तसंच हे कृत्य कोणी केलं याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.