अजबच! कोल्हापूरमध्ये जमावबंदी आदेश; आगोदरच पावसाचा कहर त्यात प्रशासनाला आली लहर
सरकारला संभाव्य महापूराचा अंदाज आला नाही. तसेच, पूरस्थिती निर्माण झाल्यानंतरही परिस्थितीचे आकलन न झाल्याने ह प्रकरण सरकारला योग्य रित्या हाताळता आले नाही. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारविरुद्ध रोष आहे. हा रोष जाहीररित्या बाहेर पडू नये यासाठीच प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याची चर्चा आता कोल्हापूरात रंगली आहे.
Floods in Maharashtra: पावसानं झोडलं आणि राजानं मारलं तर सर्वसामान्य जनतेने दाद मागयची तरी कोणाकडे. कोल्हापूरातल जनतेसमोर अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी (Kolhapur Flood) शहरात आणि घरात घुसल्याने कोल्हापूरकरांचे कंबरडे आगोदरच मोडले आहे. त्यात भर म्हणून प्रशासनाने कोल्हापूरात जमावबंदी आदेश (Ban Orders) लागू केला आहे. सरकारच्या या अजब निर्णयामुळे सर्वासामान्यासह अनेकजण हबकून गेले आहेत. दरम्यान, महापुरानंतर शहरात मदत पोहोचवताना आंदोलन-उपोषणासारखे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची समजते. प्राप्त माहितीनुसार, कोल्हापुरात 24 ऑगस्ट 2019 पर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
सरकारला संभाव्य महापूराचा अंदाज आला नाही. तसेच, पूरस्थिती निर्माण झाल्यानंतरही परिस्थितीचे आकलन न झाल्याने ह प्रकरण सरकारला योग्य रित्या हाताळता आले नाही. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारविरुद्ध रोष आहे. हा रोष जाहीररित्या बाहेर पडू नये यासाठीच प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याची चर्चा आता कोल्हापूरात रंगली आहे. दरम्यान, सरकारी आदेशाची एक इमेजही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (हेही वाचा, Raksha Bandhan 2019: सांगली येथे महिलांनी बांधली एनडीआरएफ जवानांना राखी; पूरातून वाचवल्याबद्दल मानले आभार (व्हिडिओ))
अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात टीव्ही9 ने म्हटले आहे की, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सध्यास्थिती पाहता एखादी अप्रिय घटना घडली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 'महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2019 रात्री 12 वाजेपर्यंत बंदीचे आदेश जारी केले आहेत'.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)