Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला पूर; पाणी गावात शिरल्याने 100 गावांचा संपर्क तुटला; पहा व्हिडिओ
यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. सांगली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली असून पुराचा पाणी शहरात प्रवेश केला आहे.
Sangli Rain Update: सांगली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला (Pearlkota River) पूर आला असून, पूराचे पाणी गावात शिरले आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. सांगली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली असून पुराचा पाणी शहरात प्रवेश केला आहे.
पुराच्या पाण्यामुळे गावातील अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहेत. प्रशासनाने पाण्याखाली आलेल्या अनेक घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (हेही वाचा - PMPL Bus Service: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरु होणार)
सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसर आणि वारणा धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वारणा नदीवरील काखे मांगले, शित्तुर-आरळा हे पूल आणि तीन बंधारे पाण्या खाली गेले आहेत. त्यामुळे याभागातील रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. शहरात पुराचं पाणी शिरल्याने घरात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू बोटच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. यावर्षी पहिल्यांदाचं पर्लकोटा नदीला पूर आला आहे.