IPL Auction 2025 Live

फ्लिपकार्ट ऑनलाईन सुपरमार्ट 'मुंबई'मध्ये सुरु; पहा काय मिळतील सुविधा

त्यामुळे आता ग्राहकांना घरबसल्या किराणा सामनाची ऑर्डर करता येईल.

Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) ने मुंबईत ऑनलाईन सुपरमार्ट (Flipkart Supermart) सुरु केले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना घरबसल्या किराणा सामनाची ऑर्डर करता येईल. यापूर्वी फ्लिपकार्टने नवी दिल्ली, बंगळुरु, हैद्राबाद आणि चेन्नई या शहरांत ही सेवा सुरु केली होती. आता मायानगरी मुंबईत देखील या सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. मुंबईतील 91 पिनकोड्सवर ही सेवा पुरवण्यात येईल. यात पश्चिम, मध्य उपनगरे आणि नवी मुंबईच्या काही भागांचा समावेश आहे. फ्लिपकार्टच्या या सुविधेअंतर्गत ग्राहकांना काय सेवा मिळणार, जाणून घेऊया...

# उच्च दर्जाचे किराणा सामान माफत दरात उपलब्ध होईल. तसंच त्यावर आकर्षक ऑफरसह, घरपोच सेवा आणि इत्यादी सुविधा मिळतील.

# फ्लिपकार्ट सुपरमार्टवरुन 600 रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची खरेदी केल्यास फ्री होम डिलिव्हरीची सुविधा मिळेल.

# सुपरमार्टच्या विशेष ग्राहकांना Buy Now, Pay Later ही सुविधा मिळेल. या विशेष सुविधेअंतर्गत तुम्हाला या महिन्यात खरेदी केलेल्या सामानाचे बिल पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत द्यावे लागेल.

# किराणा सामान मिळाल्यानंतर तो योग्य आहे की नाही हे पाहणे, बिल तपासून असमाधानकारक असल्यास परत पाठवणे इत्यादी अधिकार ग्राहकांना असतील.

फ्लिपकार्ट मोबाईल अॅप, डेक्सटॉप आणि मोबाईल वेबसाईट्सच्या माध्यमातून तुम्ही सुपरमार्टवरुन खरेदी करु शकाल.