महाराष्ट्र: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, 5 जण गंभीर जखमी
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मिनी बसचा चक्काचूर झाला आहे. बसमध्ये काही लोक अजूनही अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. यातील 5 जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना व्हायरसच्या भीतीने अनेकांना गावाकडचा रस्ता धरला आहे. यामुळे अनेक लोक रस्त्याने पायी प्रवास करत आहे तर काही वाहनांमधून. यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत चाललले आहे. अशातच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कळंबोली इथं भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून जवळील रुग्णालयात दाखल केले आहे. कर्नाटक येथून आलेल्या खाजगी बसने बंद पडलेल्या बसला मागून जोरदार धडक दिली. यात 9 लोक प्रवास करत होते.
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मिनी बसचा चक्काचूर झाला आहे. बसमध्ये काही लोक अजूनही अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. यातील 5 जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. धक्कादायक! उत्तर प्रदेश च्या मिहौली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 23 मजूर ठार तर 15 जण गंभीर जखमी
Maharashtra: Five people sustained serious injuries in an accident on Mumbai-Pune Expressway in Kalamboli area of Navi Mumbai. The injured have been rushed to a nearby hospital. pic.twitter.com/2Rm4heL33T
— ANI (@ANI) May 17, 2020
काल उत्तर प्रदेशमध्ये (UP) एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ट्रकमधून आपल्या घरी निघालेल्या मजूरांवर रस्त्यातच काळाने घाला घातला. दोन ट्रकच्या भीषण अपघातात मिहौली राष्ट्रीय महामार्गावरून जाणा-या 23 मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर 15 हून अधिक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on May 17, 2020 02:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

