Alphanso Mango: अबब! यंदाच्या हंगामातील आंब्याच्या पहिल्या पेटीला ५१ हजारांचा भाव, राज्यातील सर्वात उच्चांकी दर
तरी ५१ लाखांची बोली लागलेला हा आंबा देवगड तालुक्यातील आहे.
हापूस आला हो आला! नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याची सुरुवात झाली असली तरी फळांचा राजा आंबाचा सिझन आता अगदी उंबरठ्यावर येवून ठेपला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा आज दाखल झाला असुन आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव आज सकाळीचं बाजार समितीत पार पडला आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या वर्षातील पहिल्या हापूसचा लिलाव पार पडला. तरी या लिलावात खुद्द खासदार महोदय महाडिक यांनीच लिलावातील पहिली हापूस आंब्याची पेटी खरेदी केली असुन महाडिक यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सौद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सध्या या हापूस आंब्याचीच चर्चा सुरु आहे. तसेच यावर्षी महाराष्ट्रात पिकलेल्या हापूसला उत्तम दर मिळो अशी आशा वर्तवण्यात येत आहे.
यंदाच्या हंगामातील पहिला आंब्याचा लिलाव ५,००० रुपयापांसून सुरू झालेला दर हा तब्बल ५१ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. तरी ५१ लाखांची बोली लागलेला हा आंबा देवगड तालुक्यातील कुंभारमठ येथील शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांच्या आंबाच्या बगिचातील असल्याची माहिती मिळत आहे. (हे ही वाचा:- Gold Silver Price: नव्या वर्षात सोने-चांदीच्या किमतीस झळाळी, जाणून घ्या नवे दर)
देवगड हापूसला आजपर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर मानला जात आहे. राज्यातील हापूल आंब्यासाठी यावर्षीचा हा सर्वाधिक दर असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. तरी पहिलीचं बोली एवढी उंच्च लागल्याने आंबाच्या भाव यावर्षी अगदी गगनाला भीडल्याचं चित्र आहे तरी आता सर्वसामान्यांना काय भावात आंबा मिळेल आणि तो खरचं सर्वांना परवडणारा असेल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.