मुंबई येथे इमारतीला आग लागून दोघांचा मृत्यू

मुंबईच्या अंधेरी परिसरातील वीरा देसाई रोड वरील एका इमारतीला आग लागून 2 व्यक्ती मृत झाल्याची घटना घडली आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबईच्या अंधेरी परिसरातील वीरा देसाई रोड वरील एका इमारतीला आग लागून 2 व्यक्ती मृत झाल्याची घटना घडली आहे. ही आग आज संध्याकाळी साधारण साडेआठच्या सुमारास लागली होती. अंधेरी येथील एसआरए बिल्डींगच्या कदम चाळीत हा प्रकार घडला. 10व्या मजल्यावर लागलेली ही आग 11व्या मजल्यावर फैलावत गेल्यामुळे 10व्या आणि 11व्या मजल्यावरील लोक घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यातील 2 लोकांचा मृत्यू झाला असून, आगीपासून वाचण्यासाठी बेडरूममध्ये असलेल्या तीन व्यक्तींना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.

ही आग नक्की कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नसली तरी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. . (सविस्तर वृत्त लवकरच...)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement