मुंबईच्या Kamala Mills Compound परिसरात आग; अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

कमला मिल्स कंपाउंड परिसरात शनिवारी सकाळी आग लागली. या परिसरात एका इमारतीचे बांधकाम चालू आहे, या इमारतीला ही लाग लागल्याची माहिती आहे.

कमला मिल्स कंपाउंड परिसरात आग (Photo Credits: ANI)

मागच्या वर्षी कमला मिल्स कंपाउंड (Kamala Mills Compound) मध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या आठवणी अजूनही ताज्या असताना, याच कमला मिल्स कंपाउंड परिसरात शनिवारी सकाळी आग लागली. या परिसरात एका इमारतीचे बांधकाम चालू आहे, या इमारतीला ही लाग लागल्याची माहिती आहे. अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली. या आगीत अजूनतरी कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मुंबईमधील वाढत्या आगीच्या घटनांमुळे लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी मुंबईच्या चेंबूर परिसरात लागलेल्या भीषण आगीमुळे तब्बल 7 लोकांनी प्राण गमावले. मुंबईमध्ये गेल्या सहा वर्षांत आगीच्या तब्बल 29,140 इतक्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जवळजवळ 300 लोक मृत्युमुखी पडले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement