Bhiwandi Fire : भिवंडी येथे लागलेल्या भीषण आगीत 11 गोदामं जळून खाक

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथील गोदामांना आग लागली असून या आगीत 11 गोदामं जळून खाक झाली आहेत.

Bhiwandi Fire (Photo Credit : ANI)

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथील गोदामांना आग लागली असून या आगीत 11 गोदामं जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे धुराचे लोट सर्वत्र पसरत आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलांच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी देखील भिवंडी येथील गोदामाला आग लागली होती.

आगीचा फटका बसलेली गोदामं ही प्लास्टिक वस्तू, खेळणी यांची आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.