मुंबई: घाटकोपर येथील एका इमारतीला आग; अग्निशमनदलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई येथील घाटकोपर पूर्वेतील एका इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई: घाटकोपर येथील एका इमारतीला आग; अग्निशमनदलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई (Mumbai)  येथील घाटकोपर पूर्वेतील (Ghatkopar East) एका इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप  स्पष्ट झाले नाही. आगीचे प्रकरण वाढतच जात आहे. तसेच आजच्या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्णाम झाले आहे. अग्निशमनदलानंतर स्थानिक पोलिसांनीही संबंधित ठिकाणी धाव घेतली आहे. आठवड्याभरापूर्वी दिल्लीदील राणी झाशी मार्गावर एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत तब्बल 43 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले होते.

 एएनआयचे ट्वीट-

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्व येथील श्रीजी टॉवर या रहिवाशी इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2019 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).