Wadia Hospital Fire: मुंबईतील वाडिया रुग्णालयाला आग, मदत आणि बचाव कार्यास सुरुवात, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी

ज्या मजल्याला आग लागली आहे त्या मजल्यावर रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर आहे. त्याच ठिकाणी आग लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील परळ (Parel) येथील प्रसिद्ध अशा वाडिया रुग्णालयाच्या (Fire breaks out at Wadia Hospital) पहिल्या मजल्यावर मोठी आग भडकली आहे. ज्या मजल्याला आग लागली आहे त्या मजल्यावर रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर आहे. त्याच ठिकाणी आग लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दालाच्या सहा गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीच्या ज्वाळा बाहेरुनही स्पष्ट दिसत आहे. परिसरात धुराचे लोट आकाशात उडत आहेत. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. प्राप्त माहितीनुसार सायंकाळी सातच्या सुमारास आग लागल्याची माहिती पुढे आली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला तत्काळ देण्यात आली.

ट्विट

आग लागल्याची घटना घडली तेव्हा रुग्णालयात एकूण किती रुग्ण उपचार घेत होते. आगीदरम्यान रुग्णाचे ऑपरेशन सुरु होते का याबाबत निश्चित माहिती पुढे येऊ शकली नाही. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. जीवित हानीचे कोणतेही वृत्त नाही. वाडीया हे प्रसिद्ध रुग्णालय आहे. त्यामुळे मुंबई आणि राज्याच्याही कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपाचर घेण्यासाठी नागरिक येत असतात. अशा रुग्णालयाला आग लागणे म्हणजे धक्कादायक घटना आहे. या ठिकाणी नेहमीच सुरक्षेवर अधिक भर दिला जातो. असे असतानाही आग लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.