Mumbai Fire: बोईसर येथे फर्निचर गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत 20 दुकानं जळून खाक
बोईसर येथील गुंदले येथे लागलेल्या भीषण आगीत 20 फर्निचर गोडाऊन जळून खाक झाली आहेत.
बोईसर (Boisar) येथील गुंदले येथे लागलेल्या भीषण आगीत 20 फर्निचर गोडाऊन जळून खाक झाली आहेत. सकाळी 6:30 च्या सुमारास अचानक आग लागल्याने फर्निचर गोडाऊन्स आणि दुकाने जळून खाक झाली आहेत. बोईसर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीरपणे गोडाऊन आणि दुकानं उभारण्यात आली होती. तसंच त्या दुकानांमध्ये आणि गोडाऊनमध्ये आग नियंत्रण सुरक्षा व्यवस्था नव्हती.
लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, कामगार झोपेत असताना आग लागली आणि आग कळताच कामगारांनी तिथून पळ काढला. मात्र आगीने भीषण रुप धारण केले आणि त्यात 20 दुकाने जळून खाक झाली.
या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र अती उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.