Fire During Victory Rally of Shivaji Patil: कोल्हापुरात अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्या विजय रॅलीत जेसीबीमधून गुलाल उधळल्यानंतर उडाला आगीचा भडका (Watch Video)

जेसीबीमधून गुलाल टाकल्यानंतर आगीने भडका घेतला. या आगीत पाटील यांच्यासह अनेक जण जखमी झाले.

Fire During Victory Rally of Shivaji Patil (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Fire During Victory Rally of Shivaji Patil: शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल (Maharashtra Assembly Elections 2024 Results) जाहीर झाले. त्यानंतर काही वेळातच कोल्हापुरातील महागाव येथील चंदगड मतदारसंघातून (Chandgad Constituency) नवनिर्वाचित अपक्ष आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांच्या विजयी रॅलीमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली. जेसीबीमधून गुलाल टाकल्यानंतर आगीने भडका घेतला. या आगीत पाटील यांच्यासह अनेक जण जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार,पाटील यांच्या स्वागतासाठी महिलांनी आरती केली असता हा अपघात झाला. कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित आमदार आणि विजयी रॅलीवर गुलाल उधळण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. गुलाल उधळताच आगीचा भडका उडाला. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जेसीबी थेट पाटील आणि इतरांवर गुलालाची उधळण करताना दिसत आहे. त्यानंतर अचानक आगीचा भडका उडतानाही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या आगीत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (हेही वाचा -Maharashtra Assembly Election 2024 Party Wise Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत BJP ठरला 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष; जाणून घ्या पक्षनिहाय जागा)

शिवाजी पाटील यांच्या विजयी रॅलीत आग, पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Lokmat (@lokmat)

चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांचा विजय झाला. या जागेवर त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाच्या उमेदवारांशी होती. मात्र त्यांनी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा पराभव केला. (हेही वाचा: Maharashtra Election Result 2024 Winners List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या विजयी उमेदवारांची यादी)

कोण आहेत शिवाजी पाटील -

महाराष्ट्रातील चंदगड मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी नेत्रदीप कामगिरी केली. शिवाजी पाटील यांनी भाजपविरोधात बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान शिवाजी पाटील यांच्या पोस्टर्समध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची छायाचित्रे पाहायला मिळाली. त्यांनी त्यांच्या पोस्टरमध्ये पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांसारख्या नेत्यांची छायाचित्रे समाविष्ट केली आहेत. महायुतीची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने शिवाजी पाटील अपक्ष आहेत की भाजप पुरस्कृत आहेत, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.