लोणावळ्याच्या प्रसिद्ध 'मगनलाल चिक्की'चं उत्पादन थांबण्याचे FDA चे आदेश !

Maganlal Chikki (Photo Credits : Instagram )

मुंबई पुणे प्रवासादरम्यान हमखास अनेकजण लोणावळ्यात थांबून 'चिक्की' विकत घेतात. विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असणारी ही मगनलाल चिक्की (Maganlal Chikki Pune) हा अनेकांचा विक पॉंईट आहे. पण आता या चिक्कीचं उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) लोणावळ्याच्या चिक्कीच्या उत्पादनामध्ये काही त्रुटी असल्याचं जाणवल्याने हा आदेश देण्यात आला आहे.

अन्न आणि सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याच्या कारणावरून एफडीएने ही नोटिस दिल्याचं सांगितलं जात आहे. मगनलाल फ्रुड प्रोड्क्ट्स या उत्पादन कंपनीला चिक्कीच्या पाकिटामागील मजकूरामध्ये काही बदल करण्यास सांगितले आहे. तसेच चिक्कीचं सेवन मानवी आरोग्याला धोकादायक नसल्याचं प्रमाणपत्र प्रयोगशाळेतून मिळवून सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मगनलाल चिक्की विरोधात अन्न व सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम 55 नुसार त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची वेळीच पूर्तता न केल्यास संबंधित कंपनीच्या प्रत्येक संचालकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. सध्या मगनलाल फ्रुट प्रोडक्ट्स कंपनीचा व्यवहार तीन व्यक्तींच्या हातामध्ये आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif