Suicide: कर्जाची परतफेड न करता आल्याने पत्नीसह शेतकऱ्याची आत्महत्या

गोंदी पोलीस ठाण्याच्या (Gondi Police Station) अधिकाऱ्याने सांगितले की, संजय ढेबे आणि संगीता ढेबे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide (Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

महाराष्ट्रातील जालना (Jalna) जिल्ह्यात कर्ज (Loan) न भरल्यामुळे एका शेतकऱ्याने आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गोंदी पोलीस ठाण्याच्या (Gondi Police Station) अधिकाऱ्याने सांगितले की, संजय ढेबे आणि संगीता ढेबे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ढेबे यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी खासगी कंपनीकडून कर्ज घेतले होते आणि वेळेवर कर्जाची परतफेड न केल्याने ते तणावाखाली होते, असे या दाम्पत्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. हेही वाचा Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी आज सारी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर गरज असल्यास आम्ही प्रकरण CBI कडे सुपूर्त करण्यास तयार- गोवा मुख्यमंत्री Pramod Sawant

याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून दुहेरी आत्महत्येचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif