शेतकरी आणि आदिवासी आक्रमक, विधानभवनावर थेट धडकणार
हजारोंच्या संख्यने आज 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील शेतकरी आणि आदिवासी यांनी ठाणे जिल्ह्यापासून ते मुंबई पर्यंत पायी मोर्चा काढला आहे.
हजारोंच्या संख्यने आज 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील शेतकरी आणि आदिवासी यांनी ठाणे जिल्ह्यापासून ते मुंबई पर्यंत पायी मोर्चा काढला आहे. तसेच शेतकरी आणि आदिवासी यांच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी हा मोर्चा थेट विधानभवनावर धडकणार आहे.
शेतकरी आणि आदिवासींनी त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी पायी काढलेला हा मोर्चा 21-22 नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी ठाणे टोल नाका ते आझाद मैदानापर्यंत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पहाटेपासूनच या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये 50 हजारहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्वकर्ते प्रकाश बारेला यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी. तसेच वनविधायक कायद्याची अंमलबजावणी करुन आदिवासींच्या नावावर जमिनी करव्यात अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जात आहेत.