Ashadhi Wari 2025: फडणवीस सरकारकडून पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक दिंडीसाठी 20 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्य सरकारने वारीसाठी 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. पंढरपूरला येणाऱ्या 10 मानाच्या पालख्यांसह 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
Ashadhi Wari 2025: राज्यातील वारकरी विठूरायाच्या दर्शनाची वाट पाहत आहेत. राज्यभरातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. दरवर्षी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकारामांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. दरम्यान, आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारीची तयारी सुरू झाली आहे. सरकारने राज्यभरातील दिंड्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari 2025), सरकारने 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यात 10 मानाच्या पालख्यांचाही समावेश आहे. यासंदर्भात सरकारने शासन निर्णय जारी केला आहे.
दिंडीसाठी अनुदान मंजूर -
गेल्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वारीला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला 10 मानाच्या पालख्यांसह आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपयांची मदत दिली होती. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्य सरकारने वारीसाठी 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. पंढरपूरला येणाऱ्या 10 मानाच्या पालख्यांसह 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. (हेही वाचा - Special Buses For Ashadi Ekadashi Yatra: भविकांना दिलासा! यंदा आषाढी एकादशी यात्रेसाठी परिवहन महामंडळ चालवणार 5,200 विशेष बसेस, जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यांनी पालखी तळ, मुक्काम स्थळ आणि संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तथापी, आज अजित पवार यांनी श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-2025 च्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी अजित पवार यांना अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितलं की, पावसाच्या पार्श्वभूमीवर विश्रांती आणि मुक्कामाच्या ठिकाणांसाठी आवश्यक व्यवस्था करावी. दिवे घाटावर पाऊस पडला तर पालखी सोहळ्याला जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी. घाट परिसरात नागरिकांना पालखी दर्शन घेण्यास मनाई करावी. पावसामुळे रस्त्यावर दगड पडू नयेत आणि वारकऱ्यांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यावर बॅरिकेडिंग करण्यात यावे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2025 08:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

