Exit Poll तोंडावर आपटले, जनतेच्या मनात निराळेच दिसले; मैदान मरताना भाजप-शिवसेना युतीची दमछाक

पक्षनिहाय वर्तवलेल्या अंदाजात मात्र एक्झिट पोल पूर्णपणे तोंडघशी पडले आहेत. मतमोजनीनंतर हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप , शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तर इतर इतक्या जागांवर विजयी झाले आहेत. या आकड्यांवर नजर टाकता एक्झिट पोल्सच्या अंदाजात आणि प्रत्यक्ष निकालात बरीच तफावत आहे.

Maharashtra Assembly Election Exit Poll Results | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Election Exit Poll Results 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान कालावधी संपल्या संपल्या मोठ्या उत्साहाने एक्झीट पोल्स सादर करणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि संस्था तोंडावर आपटल्या आहेत. एकाही संस्था अथवा वृत्तवाहिनीचा अंदाज खरा ठरला नाही. त्यामुळे एक्झिट पोल्स अंदाजांमध्ये महायुतीच्या बाजूने कौल देण्या आला होता. हा कौल खरा ठरला असला तरी, पक्षनिहाय वर्तवलेल्या अंदाजात मात्र एक्झिट पोल पूर्णपणे तोंडघशी पडले आहेत. मतमोजनीनंतर हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप , शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तर इतर इतक्या जागांवर विजयी झाले आहेत. या आकड्यांवर नजर टाकता एक्झिट पोल्सच्या अंदाजात आणि प्रत्यक्ष निकालात बरीच तफावत आहे.

काय होते एक्झिट पोल्सचे अंदाज?

एक्झिट पोल्स संस्था महायुती आघाडी इतर
आज तक - अॅक्सिस 166-194 72-90 22-34
News18-इपसोस 243 41 4
TV9-सिसेरो 197 75 16
झी- पोल डायरी 176-192 74-88 3-27
ABP- C व्होटर 192-216 55-81 4-21
रिपब्लिक-जनता की बात 216-230 50-59 8-12

 

(हेही वाचा, दमदार प्रचार, सुमार कामगिरी; भाजपच्या निसटत्या विजयाची महत्त्वाची 5 कारणे)

विधानसभा निवडणूक निकाल (*प्राप्त आकडेवारीनुसार आखाडी, अंतिम निकाल नाही)

विधानसभा निवडणूक निकाल 2019 मिळालेल्या जागा
भाजप 102+
शिवसेना 57+
राष्ट्रवादी काँग्रेस 53+
काँग्रेस 45+
इतर 29+
शिवसेना-भाजप महायुती 159+
काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी 98

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढत होता. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत होते. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now