Pune Crime: घराबाहेरील पाळीव कुत्र्याला शेजाऱ्याने दगडाने मारल्याचा राग झाला अनावर, मालकाचा व्यक्तीवर कुऱ्हाडीचा वार
रवी घोरपडे, 40, जो बिल्डिंग पेंटर म्हणून काम करतो, या हल्ल्यानंतर त्याच्या नाकावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या आणि सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आपल्या कुत्र्याला (Dog) दगडाने मारल्यानंतर त्याच्या शेजाऱ्याच्या (Neighbour) तोंडावर आणि मानेवर कुऱ्हाडीने वार केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी (Pune Police) रविवारी एका व्यक्तीला अटक (Arrested) केली. चतुश्रृंगी पोलिस ठाण्यातील (Chatushringi Police Station) पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर (Baner) येथील शिंदे मळा परिसरात शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली.
रवी घोरपडे, 40, जो बिल्डिंग पेंटर म्हणून काम करतो, या हल्ल्यानंतर त्याच्या नाकावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या आणि सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आयुब बाबा शेख असे आहे. हेही वाचा Panchkula Shocker: विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल
सहाय्यक निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात शनिवारी रात्री घोरपडे याने शेखच्या कुत्र्याला दगडाने वार केले. त्यानंतर शेख त्याच्या घरी गेला आणि कुऱ्हाड घेऊन आला. त्याने घोरपडे यांच्या नाकावर आणि मानेवर हल्ला केला आणि परिसरात खळबळ उडाली, अधिकारी पुढे म्हणाले. एफआयआर दाखल केल्यानंतर रविवारी पहाटे शेखला अटक करण्यात आली, असे केंद्रे यांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि घातक शस्त्राने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.