Bhima Koregaon Case: आनंद तेलतुंबडे तळोजा कारागृहातून बाहेर, सर्वोच्च न्यायालयात एनआयएला धक्का
सर्वा कायदेशीर बाबींची पूर्तता करुन आनंद तेलतुंबडे हे नवी मुंबईतील (Navi Mumbai) तळोजा मध्यवर्ती कारागृहातून (Taloja Central Prison) आज बाहेर पडले.
एल्गार परिषद (Elgar Parishad) आणि माओवादी संघटनांशी असलेले संबंध प्रकरणात (Maoist Links Case) ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांची तरुंगातून सुटका झाली आहे. सर्वा कायदेशीर बाबींची पूर्तता करुन आनंद तेलतुंबडे हे नवी मुंबईतील (Navi Mumbai) तळोजा मध्यवर्ती कारागृहातून (Taloja Central Prison) आज बाहेर पडले. तेलतुंबडे यांना न्यायालयाने जामीन दिला होता. मात्र, त्याला आक्षेप घेणारी याचीका राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. जी न्यायालयाने फेटाळून लावली.
एल्गार परिषद, भीमा कोरेगाव प्रकरण आणि माओवाद्यांशी असलेल्या कथीत संबंध प्रकरणावरुन अटक झालेल्या 16 आरोपींपैकी आनंत तेलतुंबडे हे तिसरे आरोपी आहेत. जे जामीनावर बाहेर आले आहेत. या आधी कवी वरवरा राव (Poet Varavara Rao) सध्या प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर बाहेर आहेत तर वकील सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj) नियमित जामिनावर बाहेर आहेत. (हेही वाचा, Bhima Koregaon Case: 'शहरी नक्षलवाद' प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर, तरीही मुक्काम तुरुंगातच; घ्या जाणून)
ट्विट
आनंद तेलतुंबडे यांना सुमारे अडीच वर्षेापूर्वी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. 73 वर्षीय तेलतुंबडे दुपारी 1.15 च्या सुमारास तुरुंगातून बाहेर पडले. तेलतुंबडे यांनी प्रसाराध्यमांना माहिती देताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडेला जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी एनआयएची याचिका शुक्रवारी फेटाळून लावली होती. त्यानुसार, जामिनाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाने 18 नोव्हेंबर रोजी तेलतुंबडे यांना जामीन मंजूर केला होता. केंद्रीय एजन्सीने त्यांना 14 एप्रिल 2020 रोजी अटक केली होती.