Elderly Farmer Buys Mangalsutra: प्रेमाचा मुरंबा! नव्वदीपार आजोबांकडून पत्नीस मंगळसूत्र; दुकानदाराने लावले केवळ 20 रुपयेच मूल्य; व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Heartwarming Story: पत्नीसाठी मंगळसूत्र खरेदी करण्याचा 93 वर्षीय शेतकऱ्याचा हृदयस्पर्शी हावभाव अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेला. महाराष्ट्रातील एका ज्वेलर्सने त्याच्याकडून फक्त 20 रुपये घेतले. प्रेमाच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Elderly Couple Viral Video: जोडीदारावरचं प्रेम फक्त तरुण वयातच असतं असं नाही. तर जोडी जितकी वार्धक्याकडे जाते तेवढे ते अधिक फुलतं आणि केवळ फुलतंच नाही तर, प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे देखील दाखवून देते. जालना (Farmer Couple Jalna) येथील एका शेतकरी जोडप्यामध्ये याचीच प्रचिती पाहायला मिळाली आहे. या जोडप्याचा एका ज्वेलर्समधील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. पारंपारिक पांढरा धोतर-कुर्ता आणि टोपी घातलेला एक शेतकरी (वय 93 वर्षे) आपल्या पत्नीस घेऊन छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) येथील एका ज्वेलर्समध्ये गेला. तेथे त्याने आपल्या पत्नीसाठी एक मंगळसूत्र खरेदी केले. विशेष म्हणजे त्याचे प्रेम पाहून ज्वेलर्स मालकानेही विशेष सवलत दिली. जी पाहून अनेक कपल्स सोशल मीडियावर रोमँटीक झाले आहेत.
दुकानदारही भावूक
शेतकऱ्याने आपल्या पत्नीसोबत जेव्हा ज्वेलर्समध्ये प्रवेश केला तेव्हा, हे कोणीतरी भिक्षूक असावेत असे ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांना वाटले. पण, प्रत्यक्षात हे जोडपे त्यांचे ग्राहक होते. त्यांनी दुकानात जाऊन दुकानदाराची विचारपूस केली आणि मंगळसूत्र खरेदी करण्याचा विचार बोलून दाखवला. ते पाहून दुकानदारही भावूक झाला. त्याने ही शेतकरी आजोबांचे आपल्या पत्नीप्रति असलेले प्रेम पाहून मंगळसूत्राची किंमत कमी केली. इतकी की, केवळ प्रेमाने दिलेली भेट समजून केवळ 20 रुपये इतके मूल्य घेतले. केवळ 20 रुपयांना मिळालेले खऱ्याखूऱ्या सोन्याचे मंगळसूत्र पाहून आजोबाही भारावून गेले. (हेही वाचा, ‘Divorce Mehndi’ Viral Video: घटस्फोट मेहंदी! पतीपासून विभक्त झालेल्या महिलेची मेहंदी इंस्टाग्रामवर व्हायरल (See Post))
हा एक आशीर्वादच
प्राप्त माहितीनुसार, वृद्ध शेतकऱ्याचे नाव निवृत्ती शिंदे आणि त्यांच्या पत्नीचे नाव शांताबाई आहे. दोघेही जालना जिल्ह्यातील अंभोरा जहागीर गावचे रहिवासी आहेत. ते एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत आणि सध्या आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी पंढरपूरला पायी यात्रेला गेले आहेत. घटनेबद्दल बोलताना दुकान मालक म्हणाले, “ते जोडपे दुकानात आले आणि त्या माणसाने मला 1,120 रुपये दिले आणि सांगितले की त्याला त्याच्या पत्नीसाठी मंगळसूत्र खरेदी करायचे आहे. मी खूप प्रभावित झालो. मी फक्त 20 रुपये घेतले आणि त्यांना हार दिला, तो एक आशीर्वाद मानला.”
स्थानिकांनी सांगितले की, हे जोडपे त्यांच्या भक्तम सहजीवनासाठी प्रसिद्ध आहे, ते आपल्या वृद्धापकाळातही नेहमी एकत्र प्रवास करतात. मुलगा असूनही, ते त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात स्वतःच्या शक्तीवर आणि इतरांच्या सद्भावनेवर अवलंबून असतात. दुकानदार आणि या जोडप्यातील हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याला 20 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांनी वृद्ध जोडप्याच्या चिरस्थायी बंधनाचे आणि दुकानदाराने दाखवलेल्या करुणेचे कौतुक केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)