Shiv Sena: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात अंतर्गत वाद, माजी आमदाराची संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी

निवडणूक आयोगाने बहाल केल्याने शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि चिन्ह यांचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आले. याच शिवसेनेत आता पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे पुढे आले आहे. या वादाची पहिली ठिणगी अकोला जिल्ह्यात पडली आहे. ज्यामुळे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची पक्षाच्या संपर्कप्रमुख पदावरुन थेट हकालपट्टी करण्यात आली आहे.

Shiv Sena: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात अंतर्गत वाद, माजी आमदाराची संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी
Gopikishan Bajoria | (Photo Credit - File)

निवडणूक आयोगाने बहाल केल्याने शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि चिन्ह यांचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे आले. याच शिवसेनेत आता पक्षांतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे पुढे आले आहे. या वादाची पहिली ठिणगी अकोला जिल्ह्यात पडली आहे. ज्यामुळे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांची पक्षाच्या संपर्कप्रमुख पदावरुन थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. या पदाची जबाबादारी आता खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी आल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) पक्षात मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यामुळे त्यांना पदावरुन तातडीने हटवल्याे समजते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादाची राज्यभर चर्चा पाहायला मिळते. परंतू, शिंदे यांनी निवडणूक आयोगाकरवी मिळवलेल्या शिवसेनेतही भलतेच त्रांगडे झाले आहे. अकोला जिल्ह्यात तर पक्षांतर्गत वादाने अत्युच्च टोक गठले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुखाच्या घरात जाऊन तोडफोड केल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक नेतृत्व विरुद्ध पक्षातील विविध पदाधिकारी असा सामना रंगला असून तो आता परस्परांविरुद्ध पोलिस तक्रारी करण्यापर्यंत पोहोचला आहे. (हेही वाचा, हक्कभंग प्रस्ताव संजय राऊत यांच्यावर पण भरत गोगावले अडचणीत; सत्ताधाऱ्यांची कोंडी; राहुल नार्वेकरांनी रेटलं कामकाज)

सांगितले जात आहे की, मुख्यमंत्र्यांनी विशेष विकासनिधीच्या नावाखाली दिलेल्या 15 कोटी रुपयांवरुन वाद पेटला आहे. हा निधी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याऐवजी बाजोरिया यांनी स्वत:च हा पैसा लाटला, असा आरोप होत आहे. दरम्यान, हा निधी बाजोरिया यांनी स्वत:च्या विकासकामांकडे वळविल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी थेट शिंदे यांनाच पत्र लिहीले आहे. या पत्रात बाजोरिया यांचा उल्लेख थेट 'कमिशन एजंट' असा केला आहे. बाजोरिया हे पक्षवाढीसाठी काम न करता ते केवळ स्वत:हित आणि जवळच्याच लोकांचा भरणा करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला आहे. त्यानंतर शिंदे यांनी मोठा निर्णय घेत त्यांना पदावरुन हटवले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2023 12:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).