Yuva Sena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं पुढील टार्गेट आदित्य ठाकरे? शिंदे गटाकडून युवासेना कार्यकारणीची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून युवासेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षाची युवासेना (Yuva Sena) ही आमदार आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) युवासेना अशी महाराष्ट्रात (Maharashtra) ओळख आहे. आदित्य यांनी शिवसेनेतील आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात युवासेने पासूनचं केली. आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष असताना शिवसेनेने त्याच्या नेतृत्वात अनेक मोहिम फत्ते केल्या आहेत. पण आता शिवसेनेतील गटबाजी नंतर आता शिंदे गट कडून शिवसेनेच्या युवासेनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Group ) यांच्या गटाकडून युवासेनेची (Yuva Sena) नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तरी नव्याने घोषित करण्यात आलेल्या या कार्यकारणी वर घराणेशाहीची सावली पडली अस म्हणटलं तरी हरकत नाही. कारण या कार्यकारणीत शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या सुपुत्रांना संधी देण्यात आली आहे.
युवासेना नवी कार्यकारिणी
उत्तर महाराष्ट्र :
अविष्कार भुसे
मराठवाडा :
अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील
कोकण :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र :
किरण साली, सचिन बांगर
कल्याण भिवंडी :
दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
ठाणे, नवी मुंबई व पालघर :
नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे
मुंबई :
समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
विदर्भ :
ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील
तरी शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या या नव्या कार्यकारणीवर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे काय प्रतिक्रीया देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची? याचा निकाल आता निवडणूक आयोगात लागणार आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये या संघटनांचे पदाधिकारी महत्त्वाचे ठरू शकतात.