CM Eknath Shinde: कार्यकर्त्याने 'तो' शब्द उच्चारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले? काँग्रेस कार्यालयात जाऊन विचारला जाब
चांदिवली विधानसभा मतदारसंघात संपवून जात असताना काही तरुणांनी जाहीर घोषणा दिल्या. ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रस पक्षकार्यालयात जात आपण कार्य कार्यकर्त्यांना असेच शिकवता का? असा जाब विचारला.
विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये प्रचार ऐन भरात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या जाहीर फैरी झडत आहेत. आरोप आणि प्रत्यारोपांचा स्तर इतका खाली घसरला आहे की, आता प्रकरणे हमरीतुमरीवर आली आहेत. असाच काहीसा प्रकार चांदिवली विधानसभा मतदारसंघात (Chandivali Assembly Constituency) पाहायला मिळाले. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सभा होती. ही सभा संपवून जात असताना काही तरुणांनी जाहीर घोषणा दिल्या. ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झाले. ज्यामुळे त्यांनी काँग्रस पक्षकार्यालयात जात आपण कार्य कार्यकर्त्यांना असेच शिकवता का? असा जाब विचारला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरला होता. काहींच्या मते हा शब्द 'गद्दार' असा होता. दरम्यान, कार्यकर्त्याने नेमका शब्द काय वापरला याबाबत माहिती मिळू शकली नाही.
शब्द ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संताप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्याने वापरलेल्या शब्दामुळे चांगलेच नाराज झाले. जी नाराजी त्यांनी ताततीने गाडी थांबवत पोलिसांकडे व्यक्त केली. नंतर पोलिसांनी सबंधित कार्यकर्त्यास ताब्यात घेऊन कारवाई केली. बराच काळ चौकशी केल्यानंतर या व्यक्तीस सोडून देण्यात आल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, ही घटना सोमवारी (11 नोव्हेंबर) रात्री घडली. मुख्यमंत्री हे सभा संपवून घरी निघाले होते. याच वेळी त्यांचा ताफा काँग्रेसचे उमेदवार नसीम आरिफ खान (Naseem Khan) यांच्या प्रचार कार्यालयाबाहेरुन निघाला होता. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने काही अपशब्द वापरले. ज्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले. (हेही वाचा, Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्याकडून दिलगीरी व्यक्त; मतदार, काँग्रेस आणि मविआ कार्यकर्त्यांचीही मागितली माफी; कृषीप्रश्नांवर लढण्याचे आश्वसन)
'50 खोके एकदम ओके', 'गद्दार' शब्द वापरुन निवडणूक प्रचार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये '50 खोके एकदम ओके', 'गद्दार' हे शब्द विरोधकांसाठी परवलीचे झाले आहेत. जाहीर सभांमधून हे शब्द सत्ताधारी वर्गासाठी वापरले जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळत असले तरी, अशा आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचाराची पातळी मात्र घसरु लागली आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis On Rahul Gandhi: राहुल गांधी अर्बन नक्षलवाद्यांचा विळखा, लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देतात? देवेंद्र फडणवीस यांची टीका)
राज्यातील मतदारांसमोर सध्या विविध प्रश्न आहेत. बेरोजगारी, महागाई, आरोग्य, शिक्षण आणि शेतमालांचा भाव हे मतदार आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यांवर भाष्य करण्या ऐवजी सत्ताधारी वेगळेच मुद्दे चर्चेला आणत आहेत. ज्यामध्ये 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' यांसारख्या मुद्द्यांचा समावेशआहे. भारतीय जनता पक्षाने तर राहुल गांधी लाल रंगाचे संविधान का वापरतात, निळे का वापरत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. ज्याचा संबंध अर्बन नक्षलवादाशी जोडला गेला आहे. राज्यातील जनता मात्र कोणाच्या मुद्यांवर मतदान करणारे हे येत्या निवडणूक निकालातच कळणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)