Ekadashi Vrat 2020 Fast Recipes: आषाढी एकादशी व्रत करणार्यांसाठी खास उपवास स्पेशल रेसिपीज!
परंतू तुम्हांला ते शक्य नसेल तर या व्रताच्या निमित्त तुम्ही घरच्या घरी काही उपवासाचे पदार्थ बनवू शकता.
Ashadhi Ekadashi 2020 Fast Recipes: हिंदू पुराणात सांगितल्या माहितीनुसार, ज्याला परमार्थात योग्य स्थान मिळवण्याची इच्छा आहे त्याने एकादशीचे व्रत करावं. एकादशीच्या व्रताने सुरूवात केल्यास इतर व्रतांचे फळ तात्काळ मिळण्यास सुरूवात होते अशी धारणा आहे. महाराष्ट्रात वारकर्यांसह विठू माऊलीच्या भक्तांसाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे मोठे महत्त्वाचे सोहळे आहे. आषाढीला पंढरपुरात जाऊ शकले नाही तरी अनेकजण घरात एकादशीचे व्रत करून विठू माऊलीकडे प्रार्थना करतात. मग यंदा तुम्ही देखील आषाढी एकादशीचं व्रत करणार असाल तर जाणून घ्या या उपवासानिमित्त तुम्ही घरच्या घरी कोणते खास पदार्थ बनवून एकादशीचं व्रत पाळू शकता. Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी 2020 मध्ये कधी आहे? जाणून घ्या व्रत, शुभ मुहूर्त वेळ आणि चातुर्मासाचा काळ.
सर्वसाधारण नियमांप्रमाणे, एकादशीचा उपवास करणारा व्यक्ती व्रतादरम्यान केवळ फलाहार आणि दूध पिऊ शकतो. परंतू तुम्हांला ते शक्य नसेल तर या व्रताच्या निमित्त तुम्ही घरच्या घरी काही उपवासाचे पदार्थ बनवू शकता. यामध्ये रताळं, बटाटा,शेंगदाणा, साबुदाणा यांचा समावेश करता येतो. याच्या सोबतीने तुम्ही वरीचा भात आणि अन्य फलाहार घेऊ शकता.
एकादशी व्रताच्या विशेष उपवास रेसिपीज
- साबुदाणा वडे
- वरीचा भात- शेंगदाण्याची आमटी
- रताळ्याचा किस
- मुगाची खीर
एकादशीचं व्रत हे संपूर्ण दिवस पाळलं जातं. त्यामुळे दोन्ही वेळेस नियमित जेवण वर्ज्य असतं. या दिवशी उपवासाचे काही ठराविक पदार्थ बनवून संपूर्ण दिवस विठू माऊलीच्या नामस्मरणात त्याची आराधना केली जाते. मग या एकदशीच्या निमित्ताने विविध पदार्थांची रेलचेल असते. गोडाचे पदार्थ देखील नेहमीपेक्षा वेगळे बनवले जातात.