महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: PwD App च्या मदतीने दिव्यांग मतदार घरबसल्या करू शकतील मतदार नोंदणी ते व्हिलचेअरसाठी विनंती
या अॅपच्या मदतीने आता दिव्यांगांना घरबसल्या मतदार यादीमध्ये नावाची नोंद, नव मतदार नोंदणी पासून ते अगदी मतदानादिवशी व्हिलचेअरसाठी विनंती करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सहज करता येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये येत्या 21 ऑक्टोबर दिवशी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान (Maharashtra Vidhan Sabh Elections) आहे. या मतदानामध्ये नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करावं यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींच्याही सोयीचा विचार करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून PwD (Persons With Disabilities) हे खास पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. या अॅपच्या मदतीने आता दिव्यांगांना घरबसल्या मतदार यादीमध्ये नावाची नोंद, नव मतदार नोंदणी पासून ते अगदी मतदानादिवशी व्हिलचेअरसाठी विनंती करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सहज करता येणार आहे.
गूगल प्ले स्टोअरवर PwD App हे मोफत डाऊनलोड करण्याची सोय आहे. याद्वारा तुम्ही मतदानाशी निगडीत अनेक लहान सहान गोष्टी घरबसल्या करू शकणार आहात. यासोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेकडून 'C Vigil', 'Voters Helpline' ही अॅप्सदेखील सुरू केली आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या मतदानासाठी 'नवमतदार नोंदणी', मतदार यादीमध्ये Online आणि Offline माध्यमातून नाव कसं नोंदवाल?
दिव्यांग PwD App च्या मदतीने काय काय करू शकतील?
राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करण्यासाठी तुमचं नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाला मतदार यादीमध्ये तुमचे आहे की नाही? हे तपासणं गरजेचे आहे. तसेच नसल्यास किंवा नवमतदार म्हणून नाव नोंदणी करण्यास आता डिजिटल माध्यमातूनच सोय करण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांगांना केंद्रावर जाऊन फॉर्म भरण्यासाठी घालावे लागणारे हेलपाटे घालावे लागणार नाहीत.
महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा संघांमध्ये येत्या 21 ऑक्टोबर दिवशी मतदान होईल तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी होणार आहे.