Maharashtra Rain Alert: हवामान विभागाचा इशारा, राज्यात पुढे 3-4 तास महत्त्वाचे, मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक कालापासून दडी मारुन बसलेल्या पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहेत. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिला आहे. येत्या 3-4 तासांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या 3 ते 4 तासांत जळगाव, रायगड, रत्नागिरी, बीड तसेच धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे.
या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.हाच पाऊस पुढच्या काही दिवसांमध्ये असाच सक्रिय राहिल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.