Earthquake in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीताचे वातावरण
महिन्याभरात ही दुसऱ्यांचा घटना असून नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Earthquake in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात भुकंपाचे धक्के बसल्याची घटना समोर आली आहे. महिन्याभरात ही दुसऱ्यांचा घटना असून नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरीतीली साखरपा, संगमेश्वर आणि देवरुख परिसरात हे धक्के जाणवले आहेत. नागरिक झोपले असता त्यावेळी भुकंपाचे धक्के जाणवले. या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. रात्री दीड वाजता विविध ठिकाणी हे धक्के जाणवू लागले होते.
राष्ट्रीय भुकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भुकंपाचे धक्के साखरपा, संगमेश्वर आणि देवरुख येथे जाणवले. चार रिश्टर स्केल ऐवढी भुकंपाच्या धक्क्यांची तीव्रता होती. मुंबईहून जवळ 350 किमी दूर भुंकपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले.(Mumbai: मुंबईतील 441 रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजना नाहीत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अहवाल)
Tweet:
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणतेही आर्थिक नुकसान ही झाले नाही. भुकंपाच्या या घटनेबद्दल अधिक माहिती मिळवण्याचे काम केले जात आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे ही माहिती दिली गेली आहे. भुंकपामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. एका महिन्याभरात हा दुसऱ्यांदा प्रकार घडल्याने लोक घाबरले आहेत.तर नागरिकांना सुरक्षित राहण्यासह सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.