Earthquake In Mumbai: नॉर्थ मुंबईत जाणवले 2.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Earthquake In Mumbai: महाराष्ट्रातील नॉर्थ मुंबईपासून 91 किमीच्या उत्तरेला 10 किमी अंतरावर शुक्रवारी भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे धक्के सकाळी 10.33 मिनिटांनी जाणवल्याचे नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी यांनी दिली आहे. तर भुकंपाचे धक्के जाणवल्यानंतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे ही सांगण्यात आले आहे.(Earthquake In Delhi: राजधानी दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के)
दरम्यान, पालघर येथे तीन दिवसांपूर्वी मंगळवारी मध्यरात्रीच 3 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते. भूकंपाचे धक्के बसताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. लोक घराबाहेर सुद्धा आली होती. मात्र त्यावेळी सुद्धा कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नसल्याचे दिसून आले होते.(Earthquake In Palghar: पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के)
याआधी दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रातील नाशिक येथे सुद्धा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नॅशनल सेंटर सीस्मोलॉजी यांच्या मते, त्यावेळी 2.2 रिश्कर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.
यापूर्वी जुलै महिन्यात 24 तारखेला रात्री 12 वाजून 26 मिनिटांनी सुद्धा भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले होत. त्यावेळी 3.1 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा धक्का बसला होता. परंतु भूकंपामुळे नुकसान झाले नव्हते. तर गेल्या काही दिवसांत देशातील विविध ठिकाणी भूकंपाचे सातत्याने धक्के बसत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.