Dussehra 2019: महाराष्ट्रात आज 'या' 3 ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन; मोहन भागवत, उद्धव ठाकरे आणि अमित शहा काय बोलणार याकडे लक्ष

दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या मुहूर्तावर RSS व शिवसेनकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गृह्म्णात्री अमित शहा सुद्धा भगवानगडावरून जनतेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्र्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसऱ्या मेळाव्यात नेमकी काय भूमिका मांडली जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Mohan Bhagwat, Uddhav Thackrey, Amit Shah (Photo Credits: PTI)

राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचा (RSS) श्री विजयादशमी मेळावा (Dussehra Rally) आज सकाळपासून नागपूर (Nagpur) येथे सुरु झाला आहे. यासाठी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी सकाळीच खास उपस्थिती लावली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे मुंबईत सुद्धा शिवसेनेचा (Shivsena)  दसरा मेळावा पार पडणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे भगवानगडावर आयोजित मेळाव्यातून जनतेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रात अवघ्या दोन आठवड्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मेळाव्यात नेमके काय बोलले जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

प्राप्त माहितीनुसार, 2018 च्या दसऱ्या मेळाव्यात राम मंदिर हा विषय संघ व शिवसेना दोघांकडूनही उचलण्यात आला होता, युती होण्याच्या मागे हे एक महत्वाचे कारण ठरल्याचे म्हंटले जाते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्व व राम मंदिरावर भर देत त्या आधारे भाजपशी युती होऊ शकते, असे अप्रत्यक्ष संकेत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिले होते. तर नागपूरच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरावर भर दिला होता.

RSS विजयादशमी सोहळा ट्विट

शिवसेना दसरा मेळावा 

दुसरीकडे, शिवसेनेचा दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने सुरु झाला होता पक्षाची भूमिका मांडण्यासाठी या माध्यमातून जनतेला संबोधित करत होते हीच परंपरा कायम ठेवत आता उद्धव ठाकरे सुद्धा दसऱ्या मेळाव्यात राजकीय मनोगत मांडतात. सध्या सुरु असणाऱ्या आरे मेट्रोशेड संबंधित वादावरून आज पुन्हा शिवसेना बोलण्याची चिन्हे आहेत.

भगवानगड दसरा मेळावा

दरवर्षी याठिकाणी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या पुढाकाराने मेळाव्याचे आयोजन होते यंदा निवडणुकीचे औचित्य साधून शहा देखील या सोहळ्यात भाग घेणार आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून राज्यभरात प्रचारसभा सुरु होत आहेत, त्यामुळे दसऱ्या मेळाव्याचे निमित्त साधूनच या प्रचाराचा नारळ फोडण्यात येईल. या माध्यमातून भाजप व शिवसेनेची विधानसभेतील रणनीती सुद्धा काही अंशी स्पष्ट होईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now