Dry Days in Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर 4 दिवस ड्राय डे; गोवा मध्येही निर्बंध लागू राहणार
निवडणूकीची प्रक्रिया निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीची (Maharashtra Vidhan Sabha Election) धामधूम सुरू आहे. आता या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि निवडणूकीची कार्यक्रम सुरळीत पार पडावी म्हणून म्हणून दारू बंदी जाहीर करण्यात आली आहे. ही दारूबंदी महाराष्ट्रासोबतच गोवा राज्यातही लागू असणार आहे. गोवा हे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य आहे. तसेच गोव्यात दारू स्वस्ताने मिळत असल्याने तेथून खरेदीचा ओढा अधिक असतो. पण हे टाळण्यासाठी आता बॉर्डर परिषदेमध्ये महाराष्ट्र गोव्यात 4 दिवस ड्राय डे जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र, गोवा मध्ये कधी असणार ड्राय डे
महाराष्ट्रात मतदानापूर्वी 2 दिवस ड्राय डे आहे तर 23 नोव्हेंबर हा मतमोजणीच्या दिवस देखील ड्राय डे असणार आहे. विधानसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर 18 नोव्हेंबरला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
18 नोव्हेंबर - संध्याकाळी 6 नंतर दारू विक्रीला बंदी
19 नोव्हेंबर - संपूर्ण दिवस दारू बंदी
20 नोव्हेंबर - संध्याकाळी 6 पर्यंत दारूबंदी
23 नोव्हेंबर - संध्याकाळी 6 पर्यंत दारूबंदी (मतमोजणी)
निवडणूकीची प्रक्रिया निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे मतदानापूर्वी आणि मतमोजणीच्या दिवशी देखील निष्पक्षपणे काम केले जाणार आहे. हे 4 दिवस दारूच्या खरेदी विक्री वर निर्बंध असणार आहे. राज्यात दारूची दुकानं बंद राहणार आहेत.