Pune Shocker: इंदापूरमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाचा धिंगाणा, जेवण नाकारल्याने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवला, वाहनांचे नुकसान (Watch Video)
जेवण नाकारल्याच्या कारणातून मद्यधुंद कंटेनर चालकाने रागाच्या भरात कंटेनर हॉटेलमध्ये घुसवला.
Pune Shocker: पुण्याच्या इंदापूरमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाचा(DrInk and Driver)फिल्मी स्टाईल थरार पहायला मिळाला. जेवण नाकारल्याने एका मद्यधुंद चालकाने त्याचा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवला. पुणे - सोलापूर महामार्गावर (Pune - Solapur Highway)ही घटना इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली आहे. विशेष म्हणजे कंटेनर चालकाने आधी हॉटेल समोरील दोन चारचाकी गाड्यांना कंटेनरची धडक देत त्यांचा चुराडा केला. यात वाहणांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर चालकाने हॉटेलचेही नुकसान केले. या घटनेनंतर मंद्यधुंद कंटनेर चालकाला तिथल्या लोकांनी खाली उतरवले, चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं आहे. (हेही वाचा:Pune Shocker: पुण्यात 10 वर्षांच्या मुलीवर 67 वर्षीय व्यक्तीचे लैंगिक अत्याचार; शाळेतील 'गुड टच-बॅड टच' वर्कशॉपद्वारे समोर आला धक्कादायक प्रकार)
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापुरातील हिंगणगांव येथे रोड लगत असणाऱ्या हॉटेल गोकुळमध्ये ही घटना घडली. जेवण नाकारल्याच्या कारणातून मद्यधुंद कंटेनर चालकाने रागाच्या भरात हा पराक्रम केला. कंटेनर चालकाने कंटेनर एक स्कुटी, एक कारवर चढवली. त्याशिवाय, हॉटेलचे नुकसान केले. (हेही वाचा:Pune Shocker: Delhi Shocker: दिल्लीतील डीबीजी रोड परिसरात अंगावर एसी पडल्याने तरुणाचा मृत्यू, दुसरा जखमी (Watch Video))
एक राऊंड मारला अन् कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवला
नेमक प्रकरण काय?
सोलापूरहून पुण्याच्या दिशेने कंटेनर येत होता. दरम्यान हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळ येथे चालक थांबला आणि त्याने हॉटेल मध्ये जेवण मागितलं. मात्र हॉटेल बंद असल्याचे सांगत त्याला तेथे जेवण नाकारण्यात आले. त्यानंतर व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे कंटेनर चालकाने हॉटेलच्या बाहेर एक राऊंड मारत समोर असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर लोकांनी त्या कंटेनर चालकाला गाडी थांबवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर गाडीचालकाने गाडी थांबवली. नंतर लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.