डॉ. नीलम गोर्हे यांनी दाखल केला महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज
नीलम गोर्हे यांचं नाव पुढे आले आहे. त्यासाठी आज त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्हे (Dr. Neelam Gorhe) आता विधानपरिषदेच्या उपसभापदी विराजमान होण्याची शक्यता आहे. या पदावरील कॉंग्रेस पक्षाने दावा सोडल्यास डॉ. नीलम गोर्हे यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा आहे. कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरे हे 17 जुलै 2018 पर्यंत विधानपरिषदेचे उपसभापदी होते. मात्र त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. संख्याबळाच्या जोरावर कॉंग्रेसने या पफावर दावा केला होता. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामराम केला आहे.
कॉंग्रेसनं विजय वडेट्टीवार यांचं नावं विरोधीपक्षनेतेपदासाठी निश्चित केलं आहे. त्याचे पत्र काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिलं आहे. मात्र, उपसभापतीपदाचा दावा केल्यास विरोधीपक्षनेतेपद देणार नाही, असा पवित्रा युतीनं घेतल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे.
विधान परिषद उपसभापतीसाठी उमेदवारी अर्ज दखल करतांना डॉ नीलम गोर्हे यांच्यासोबत दिवाकर रावते, विनोद तावडे, महादेव राव जानकर हजर होते.