Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana: आता अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने वीज जोडणी उपलब्ध होणार, जाणून घ्या कसा घेता येईल लाभ
आता अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे, यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून, येत्या 14 एप्रिल ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ‘डॉ. बासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
आता अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे, यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून, येत्या 14 एप्रिल ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ (Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार, या योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. याशिवाय या योजनेत अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करण्याबाबतच्या उपाययोजनांचाही समावेश असेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जगभरात 14 एप्रिल 2021 रोजी साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबविण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: मुंबईत लवकरच 5300 बेड आणि 800 आयसीयू बेड असलेले जम्बो कोव्हीड सेंटर उभारले जाणार)
असा घेता येईल लाभ –
- योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीकरिता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरिता आवश्यक कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, रहिवासी दाखला आदी असणे आवश्यक असेल.
- अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफ लाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
- शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
- लाभार्थ्याने 500 रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील.
- अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
- महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील 15 कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
याशिवाय, अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगांमधील वीज समस्यांचे प्राध्यान्याने निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर प्रत्येक मंडळातील किंवा जिल्हास्तरावर अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यक्षेत्राकरिता कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2021 09:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

