Maharashtra Police: कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
DG लोन म्हणजेच कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देण्याची योजना पुन्हा सुरु करणार असल्याची राज्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून घोषणाकरण्यात आली आहे.
DG लोन (Loan) ही महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) खात्यातील एक महत्वपूर्ण योजना मानली जाते. यानुसार कॉन्स्टेबल (Constable) दर्जाच्या कर्मचाऱ्यांना खात्या अंतर्गत 20 लाखांपर्यंतचं कर्ज मिळू शकते. पण उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) ही योजना थांबवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृहमंत्र्यांचा कारभार आल्यानंतर या योजनेची सविस्त माहिती घेत ही योजना पुन्हा सुरु करणार अशी माहिती एका वृत्तवाहिनीला दिली आहे. तरी ही योजना पुन्हा सुरु झाल्यास महाराष्ट्र पोलिसांसाठी (Maharashtra Police) ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) मुहूर्तावर शिंदे फडणवीस सरकारकडून (Shinde-Fadnavis Government) राज्यातील पोलिस बांधवांना हे मोठं गिफ्ट असं म्हणायला हरकत नाही.
काही दिवसांपूर्वीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील बीडीडी चाळीत (BDD Chawl) राहणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरं देण्यात येणार अशी मोठी घोषणा केली होती. बीडीडी चाळ पुनर्विकासात (BDD Chawl Redevelopment) पोलिसांना केवळ 15 लाख रुपयांमध्ये घरे देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला होता. तर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Maharashtra Home Minister Devendra Fadnavis) या DG लोनच्या घोषणेनंतर मुंबई पोलिसांसह (Mumbai Police) महाराष्ट्र पोलिसांना (Maharashtra Police) देखील आनंदाची बातमी आहे.
केवळ अडीच महिन्यांच्या कालवधीत शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) उध्दव ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतलेले विविध निर्णय बदलले आहेत. तरी पुढील कालवधीत महाराष्ट्र पोलिसांप्रमाणेच (Maharashtra Police) राज्यातील जनतेसाठी शिंदे फडणवीस सरकार काय मोठ्या घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.