मराठी माणसाचा अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

सचिनच्या या भूमिकेनंतर त्याला ट्रोल करण्यात आले. तर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.

Devendra Fadnavis Reaction on black oil on Sachin Tendulkar's cut-out (Photo Credits: ANI, PTI)

देशभरात पेटलेल्या शेतकरी आंदोलनावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केलेले ट्विट खूपच चर्चिले गेले. सचिनच्या या भूमिकेनंतर त्याला ट्रोल करण्यात आले. तर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. केरळमध्ये तर सचिनच्या ट्विटनंतर आक्रमक झालेल्या युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटवर काळे तेल ओतून आपला निषेध नोंदवला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का? असा सवाल केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडूलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?"

देवेंद्र फडणवीस ट्विट:

काय होतं सचिन तेंडुलकर याचं ट्विट?

भारताच्या सार्वभोत्मासंदर्भात कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरच्यांनी बघ्याच्या भूमिकेत असावं हस्तक्षेप करु नये. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेतील. देशासाठी एकत्र राहुया. अशा आशयाचं ट्विट सचिनने केलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर त्याने अप्रत्यक्षरित्या तिला उत्तर देताना हे ट्विट केले. (Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या परदेशींना सचिन तेंडूलकर यांच्याकडून चोख प्रत्युत्तर)

विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनावर इतके दिवस काहीही भाष्य न करणाऱ्या क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटींनी पॉप स्टार रिहानाच्या ट्विटनंतर 'इंडिया टुगेदर' म्हणत सरकारचे समर्थन करणारी ट्विट केली