नवे मुख्यमंत्री कोण ते आदित्य ठाकरे यांनी काय करावं... पाहा देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले प्रमुख 10 मुद्दे

नवं सरकार कधी स्थापन करणार, सत्तेचा गणित काय असणार आणि नवा मुख्यमंत्री कोण बनणार अशा अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

Devendra Fadnavis | (PTI)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. जरी हा संवाद अनौपचारिक असला तरी औपचारिक बाबी पत्रकारांसोबत त्यांनी शेअर केल्या. नवं सरकार कधी स्थापन करणार, सत्तेचा गणित काय असणार आणि नवा मुख्यमंत्री कोण बनणार अशा अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

इतकंच नाही तर पत्रकारांशी मारलेल्या गप्पांमधून तेच पुढचे 5 वर्षही मुख्यमंत्री असतील असं गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. चला तर बघूया या गप्पानमधील प्रमुख 10 मुद्दे ज्यांवर फडणवीस यांनी भाष्य केले.

1) मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहील याबाबत काही शंका नाही. अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री असा कोणताही ठराव नाही.

2) सेनेकडून मुख्यमंत्री पदाची मागणी आली होती मात्र त्यांना कोणताही आश्वासन दिलं नाही. आम्ही कोणताही फॉर्म्युला घेऊन चाललो नाही.

3) सेनेला पाचही वर्ष मुख्यमंत्रीपद पाहिजे वाटू शकेल, पण वाटणं आणि होणं यात फरक.

4) शिवसेना कोणताही पर्याय शोधत नाही. मंत्रीपदाबाबत सेनेकडून कोणतीही मागणी आलेली नाही.

5) आम्ही लवकरच सरकार स्थापन करु, काहीही बातम्या आल्या तरी सरकार आमचंच असेल.

6) आदित्य ठाकरे काय बनतील हे शिवसेना ठरवेल. सामनावर आमची नाराजी आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याविरोधात तर असं लिहून पाहा.

7) काँग्रेस राष्ट्रवादीने सेनेसोबत जाऊ असं म्हटलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल असं कधीही म्हणाले नाहीत, आम्हीच शिवसेनेसोबत जाऊ.

8) आम्ही फर्स्ट क्लासमध्ये आलो आहे, पण आमच्या मेरिटबद्दल कोणच बोलत नाहीत.

9) शपथविधीचा मुहूर्त लवकरच कळेल. आतमध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. लवकरच फॉर्म्युला कळेल.

10) अमित शाह उद्या येणार नाहीत. अधिकृत आणि अनधिकृत आमच्या बैठका सुरू आहेत.

शिवसेना-भाजप चर्चेची पहिली बैठक रद्द; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वतीने खा. संजय राऊत यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यांवरून शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. या पडसादांचा पहिला भाग उभय पक्षांची बैठक रद्द होण्यात झाला आहे.

भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये होणारी बैठक शिवसेनेकडून रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर भाजप नेत्यांची तातडीची बैठक पार पडत आहे.