उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह; खबरदारी म्हणून होम क्वारंटाईनचा निर्णय

थोडा ताप असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

Ajit Pawar | (File Image)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना गेल्या काही दिवसांपासून थकवा आणि थोडा ताप असल्याने त्यांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. मात्र ती निगेटीव्ह आली आहे. परंतु, थकवा कायम असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी होम क्वारंटाईनचा (Home Quarantine) निर्णय घेतला आहे. दरम्यान, आजच्या नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीला ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत.

आज शरद पवार यांच्यासोबत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बोलवण्यात आली आहे. या बैठकीला अजित पवार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहतील, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. मात्र आजचा जनता दरबार रद्द करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कालही मंत्रालयातील बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. (Ajit Pawar on Eknath Khadse: भाजप नेते एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश? अजित पवार काय म्हणाले पाहा)

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी अजित पवार यांनी पुणे, इंदापूर दौरा केला. त्यानंतर शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांना थकवा जाणवत होता. तर दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. (Reopening Schools In Maharashtra: महाराष्ट्रात दिवाळी नंतर शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल-अजित पवार)

दरम्यान, अजित पवार यांनी पुणे, पिंपर चिंचवड आणि राज्यातील विविध भागातील जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्याकडून अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसंच नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.