Delhi Horror: दिल्ली मध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; 24 वर्षीय तरूणाने लिव्ह इन पार्टनरचा जीव घेऊन त्याच दिवशी केले दुसर्या मुलीशी लग्न
महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी साथीदाराचा खून केला त्याच दिवशी तो दुसर्या मुलीशी विवाहबद्ध झाला. 9 आणि 10 फेब्रुवारीच्या रात्री ही हत्या झाली आहे.
दिल्ली मध्ये अजून एक श्रद्धा वालकर प्रकरण समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी मन विषण्ण करणारं हे हत्याकांड समोर आलं. त्याचप्रमाणे अजून एका लाईव्ह इन पार्टनरने आपल्या साथीदाराचा खून करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. ही दिल्लीच्या Mitraon भागातील घटना आहे. Crime Branch unit च्या माहितीनुसार, आरोपी 24 वर्षीय साहिल गेहलोत आहे. तर मृत मुलीचं नाव निक्की यादव आहे.
साहिल आणि निक्की मागील काही वर्षांपासून रिलेशनशीप मध्ये आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी साथीदाराचा खून केला त्याच दिवशी तो दुसर्या मुलीशी विवाहबद्ध झाला. 9 आणि 10 फेब्रुवारीच्या रात्री ही हत्या झाली आहे. हे देखील नक्की वाचा: Crime: मुंबईमध्ये लग्नाचा विषय टाळत असल्याने लिव्ह-इन पार्टनरची रागाच्या भरात केली हत्या, महिला अटकेत .
आरोपीने मुलीची मोबाईलच्या डेटा कॅबलने गळा आवळून हत्या केली. कारमध्ये हत्या करून मुलीचा मृतदेह त्याच्या दिल्लीतील ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवला. 10 फेब्रुवारीला पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपीचा शोध सुरू झाला. फरार असलेला साहिल कैर गावाची वेश ओलांडताना दिसला. सुरूवातीला तपास यंत्रणांची तो दिशाभूल करताना आढळला. पण अधिक चौकशी करताना त्याने मैत्रिणीचा खून करून तिचा मृतदेह ढाब्यातील फ्रीज मध्ये ठेवल्याची माहिती दिली.
साहिल आणि निक्की यांची उत्तम नगर मध्ये कोचिंग सेंटर्स मध्ये जाताना भेट व्हायची सुरूवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुलाने ग्रेटर नोएडा मध्ये 2018 साली Galgotiya College मध्ये D Pharma साठी अॅडमिशन घेतलं होतं तर मुलीने त्याच कॉलेजमध्ये BA (English Hons.)साठी अॅडमिशन घेतलं होतं. यानंतर दोघेही ग्रेटर नोएडा मध्येच भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. हळूहळू त्यांची मैत्री दृढ होत होती. ते मनाली, ऋषिकेश, हरिद्वार, देहरादूनला एकत्र फिरायला गेले.
कोविड लॉकडाऊन मध्ये ते आपापल्या घरी परतले आणि लॉकडाऊन संपताच पुन्हा एकत्र द्वारका भागात रहायला लागले. आरोपीने आपल्या रिलेशनशीपबाबत घरी माहिती दिली नव्हती. मुलाच्या कुटुंबियांकडून त्याचे दुसर्याच मुलीसोबत लग्न करण्यासाठी भूणभूण सुरू झाली होती. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी मुलाचा साखरपूडा केला आणि 9-10 फेब्रूवारी हा लग्नाचा मुहूर्त देखील निश्चित केला होता. दरम्यान मुलाने या लिव्ह ईन पार्टनर मधील मुलीला त्याच्या लग्नाची खबर लागू दिली नाही.
मुलीला मात्र त्याच्या लग्न आणि साखरपुड्याची भणक लागली. तिने त्याला जबाब विचारला. यामधूनच त्यांच्यात वाद झाले. कारमध्येच त्याने रागाच्या भरात मुलीचा गळा आवळला.