Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: अंगावर उकळतं पाणी पडल्याने अवघ्या पंधरा दिवसाच्या चिमुकलीचा मृत्यू,छत्रपती संभाजीनगर येथील घटना
जिल्हातून पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात एका पंधरा दिवसाच्या चिमुकलीची गरम पाणी अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात वाळूज परिसरात एका हॉडग्लोज कारखान्याला आग लागली ही घटना ताजी असताना, जिल्हातून पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात एका पंधरा दिवसाच्या चिमुकलीची गरम पाणी अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. आईने गॅसवर ठेवलेल गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला आहे नुरेश अजिम सय्यद असं मृत मुलीचे नाव आहे. (हेही वाचा- बेस्ट बसची दुचाकीला धडक; 22 वर्षीय झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानपूरा भागात ही घटना घडली. नुरेनच्या आईने सकाळी तीच्या वडिलांसाठी पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवले होते. दरम्यान, पाण्याचे पातेले चिमुकलीच्या अंगावर पडले आणि या घटनेत चिमुकली गंभीर भाजली. आई वडिलांनी तिला तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, शनिवारी सकाळी उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आई वडिलांच्या निष्काळाजीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली. पाणी इतके गरम होते की, चिमुकलची संपुर्ण अंग भाजले होते. नुरेनच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे.या घटनेनंतर गावात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2023 11:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

