Maharashtra Gram Panchayat Election Result 2021: आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हा, अजित पवारांचा विजयी उमेदवारांना मोलाचा सल्ला

या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या विजयी उमेदवारांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Ajit Pawar (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021) आता लवकरच पूर्णपणे हाती लागेल. यात भाजप विरुद्ध महाविकासआघाडी यांच्यात चुरस सुरु आहे. यात आतापर्यंत हाती लागलेल्या निकालामध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विटच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या विजयी उमेदवारांना मोलाचा सल्ला दिला आहे.

'स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे' असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Gram Panchayat Election Result 2021: भाजपचे 6000 सरपंच होतील, चंद्रकांत पाटील यांचा दावा

तर दुसरीकडे 'आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, 'भाजपाच नंबर एकचा पक्ष असेल' असा दावा भाजपते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतो यावरुन हेच दिसतं' असं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत. राज्यात भाजपचे सहा हजार सरपंच होतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान मनसेने ठाणे, बीड, बुलढाणा, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत जिंकली आहे.सोबतच रत्नागिरीच्या नवशी ग्रामपंचायती मध्ये मनसेने खातं उघडलं आहे. तर उस्मानाबादमधील जळकोट ग्रामपंचायतीत जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे विजयी ठरले आहेत