Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचा जोर आणखी वाढणार, मुंबई-ठाणे येथे तुफान पावसाची शक्यता
Cyclone Tauktae: पूर्व मध्य अरेबियन समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळ वेगाने पुढे सरकरत आहे. याचा फटका आता सध्या गोव्याला बसला आहे. तर पणजीत वेगाने वारे वाहत असून तुफान पाऊस सुद्धा कोसळत आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी झाडे पडली आहेत. आयएमडीच्या मते, चक्रीवादळ शनिवारी उशिरा रात्री किंवा रविवारी पहाटे मुंबईहून काही अंतरावरुन जाण्याची शक्यता आहे. यासाठी अधिक नुकसान होण्याची शक्यता नाही पण मुंबई, ठाणे आणि पालघर येथे तुफान वारे वाहण्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई आयएमडीचे उप-महानिर्देशक जयंत सरकार यांनी असे म्हटले आहे की, तौक्ते चक्रीवादळ सध्या ईस्ट सेंट्रल अरेबियन सागरात आहे. मात्र पुढील 24 तासात आणखी रौद्र रुप चक्रीवादळ निर्माण करणार आहे. 18 मे रोजी सकाळी गुजरातला धडकणार असल्याची शक्यता आहे. त्यांनी असे म्हटले की, मुंबईत आज सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोमवारी (17 मे) सुद्धा जोरात पाऊस पडणार असून 18 मे रोजी मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबईत आज आणि उद्या 60-70 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. पावसामुळे अधिक नुकसान होणार नाही पण वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
तर महापालिकेने चक्रीवादळामुळे जाहीर करण्यात आलेल्या अलर्टमुळे 580 कोरोनाग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. केंद्राने शनिवारी रात्री रुग्णांना हलवले आहे. तर अधिकाऱ्यांनी वांद्रे-वरळी सी लिंक सावधगिरी म्हणून बंद केले आहे.(Cyclone Tauktae मुळे केरळ मधील तिरुअनंतपुरम येथे घरांचे मोठे नुकसान See Pics)
आयएमडीच्या मते,चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केले आहे. येत्या काळात सुद्धा ते अतिरौद्र होण्याची शक्यता आहे. त्यांनी असे म्हटले की, चक्रीवादळ उत्तर-उत्तर पश्चिमेच्या दिशेने सरकरण्यासह 17 मे रोजी संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार आहे. तर 18 मे रोजी सकाळी पोरबंदर आणि महुवा (भावनगर जिल्हा) दरम्यान गुजरातच्या तटावरुन जाण्याची शक्यता आहे. तौकक्ते चक्रीवादळ 6 तासादरम्यान जवळजवळ 11 किमी प्रति तास वेगाने उत्तरेच्या दिशेने सरकरत आहे.(Cyclone Tauktae: तौकक्ते चक्रीवादळामुळे हाहाकार, कर्नाटकात 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर अमित शहा यांनी बोलावली बैठक)
Tweet:
रविवारी घाटातील क्षेत्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात सोमवारी विविध ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आहे. तर गुजरातच्या तटांवर चक्रीवादळ धडकल्यानंतर तुफान पावसासह 175 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा तौक्ते चक्रीवादळासंबंधित एक बैठक बोलावली होती. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्र शासित प्रदेश दमण-दीव आणि दादरा-नगर हवेलीच्या मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसह केंद्रीय मंत्रालयांसह चक्रीवादळा पासून बचाव करण्यासाठी संबंधित एजेंसीकडून उपाययोजना आणि योजनांबद्दल स्थितीचा आढावा घेतला.