Cyclone Tauktae Day-Wise Forecast: पुढील काही तासात चक्रीवादळ 'अतिजास्त तीव्रते'मध्ये रुपांतरीत होणार; जाणून घ्या वादळाचा मार्ग, वाऱ्याचा वेग व त्याची तीव्रता

पुढील काही तासात या चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची आणि त्यापुढील 7-8 तासात अतिजास्त तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. ते उत्तर-वायव्य दिशेला सरकण्याची खूपच जास्त शक्यता आहे.

Cyclone Tauktae Path (Photo Credits: IMD)

तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) अरबी समुद्रावर आग्नेय भागाशी संलग्न मध्यपूर्व भागातून, उत्तर-वायव्य दिशेला सरकत असून गेल्या सहा तासात ताशी 11 किमी वेगाने त्याची वाटचाल झाली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज 15 मे 2021 रोजी सकाळी  8.30 वाजता त्याचे स्थान 12.8° उत्तर अक्षांश आणि 72.5°पूर्व रेखांशाजवळ होते. हे ठिकाण अमीनदीवी बेटापासून सुमारे 190 किमी उत्तर-वायव्य, पणजीच्या दक्षिण-नैऋत्येला 330 किमी आणि गुजरातमधील वेरावळपासून 930 किमी तसेच पाकिस्तानमधील कराची पासून 1020 किमीवर होते. यावेळी वाऱ्याचा वेग 175 किमी प्रतितास असेल. या चक्रीवादळामुळे केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल.

पुढील काही तासात या चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची आणि त्यापुढील 7-8 तासात अतिजास्त तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. ते उत्तर-वायव्य दिशेला सरकण्याची खूपच जास्त शक्यता असून, 18 मे रोजी ते दुपारी किंवा संध्याकाळी गुजरातमध्ये पोरबंदर आणि नलियादरम्यानची  किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाचा मार्ग -

Cyclone Tauktae Path (Photo Credits: IMD)

चक्रीवादळाचा दिवसवार अंदाज-

तारीख/वेळ (IST) स्थान 

(Lat. 0N/ long. 0E)

वाऱ्याचा वेग

 (Kmph)

चक्रीवादळाची तीव्रता 
15.05.21/0830 12.8/72.5 75-85 gusting to 95 Cyclonic Storm
15.05.21/1130 13.2/72.5 85-95 gusting to 105 Severe Cyclonic Storm
15.05.21/1730 13.8/72.4 95-105 gusting to 115 Severe Cyclonic Storm
15.05.21/2330 14.5/72.3 110-120 gusting to 135 Severe Cyclonic Storm
16.05.21/0530 15.3/72.0 120-130 gusting to 145 Very Severe Cyclonic Storm
16.05.21/1730 16.5/71.5 130-140 gusting to 155 Very Severe Cyclonic Storm
17.05.21/0530 18.0/70.7 145-155 gusting to 165 Very Severe Cyclonic Storm
17.05.21/1730 19.5/70.0 150-160 gusting to 175 Very Severe Cyclonic Storm
18.05.21/0530 20.7/69.4 150-160 gusting to 175 Very Severe Cyclonic Storm
18.05.21/1730 22.0/69.1 145-155 gusting to 165 Very Severe Cyclonic Storm
19.05.21/0530 24.5/70.0 70-80 gusting to 90 Cyclonic Storm

चक्रीवादळाचे सद्य स्थान (Cyclone Tauktae Windy Tracker) -

या चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर पुढील इशारा देण्यात आला आहे-

पाऊस-

कोकण आणि गोवा- 16 मे रोजी कोकण आणि गोवा आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आणि 17 मे रोजी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

वाऱ्याचा इशारा- 16 मे रोजी वारे 60 ते 70 किमी वेगाने आणि त्यानंतर त्यापेक्षा जास्त 80 किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

समुद्राची स्थिती- 15 आणि 16 मे रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील.

मच्छिमारांना इशारा- या काळात महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक आणि लगतच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात येत आहे.vजे मच्छिमार उत्तर अरबी समुद्रात आहेत त्यांना परत फिरण्याची सूचना करण्यात येत आहे.

हानीची शक्यता- गुजरातमध्ये देवभूमी, द्वारका, कच्छ, पोरबंदर, जुनागढ, गीर, सोमनाथ आणि जामनगर जिल्ह्यात हानी होण्याची शक्यता आहे. कच्च्या आणि मातीच्या घरांना धोका असून जोरदार वाऱ्याने घरांची छपरे उडून आणि हवेतून येणाऱ्या इतर वस्तूंमुळे हानीची भीती आहे. वीजेचे खांब आणि वाहिन्यांना देखील धोका आहे. रेल्वेमार्गांना देखील किरकोळ धोका संभवतो. मिठागरे आणि तयार पिके तसेच झुडुपांची हानी होण्याची आणि झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: 15 ते 18 मे दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढील चार दिवसांचा अंदाज)

उपाययोजना- मासेमारी पूर्ण थांबवावी, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे तर्कसंगत नियमन करावे. वादळाचा धोका असलेल्या भागातील लोकांनी घराबाहेर पडू नये. जलवाहतूक करू नये.

दरम्यान, या चक्रीवादळाचे नाव 'तौक्ते' हे म्यानमारने दिले असून याचा, अर्थ 'गेको' म्हणजेच अर्थ आवाज करणार पाल असा होतो. भारतीय किनारपट्टीवर 2021 चे हे पहिले चक्रीय वादळ ठरणार आहे. हे चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर सरकत असून महाराष्ट्रासाठी पुढील 2 दिवस अतिशय महत्वाचे असणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now