CSMT-Manmad Special Train Time Table: सीएसएमटी- मनमाड दरम्यान 12 सप्टेंबरपासून धावणार स्पेशल ट्रेन; इथे पहा वेळापत्रक

Train (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र हळूहळू कोरोना सोबत जुळवून घेत पुन्हा प्रवास आणि वाहतूक सुरू झाल्याने आता टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी ट्रेन सुरू केल्या जात आहे. विशिष्ट मार्गावर सुरू झालेल्या स्पेशल ट्रेनमध्ये महाराष्ट्रात 12 सप्टेंबरपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नाशिकच्या मनमाड जंक्शन (CSMT-Manmad Special Train Time Table) स्टेशन दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याचं बुकिंग 10 सप्टेंबर पासून सुरू झालं आहे. दरम्यान पूर्ण आरक्षित या गाडीमध्ये प्रवास कराण्यासाठी नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असेल.

दरम्यान मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ही गाडी मुंबई मध्ये सीएसएमटी, दादर, कल्याण, इगतपुरी, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन या स्थानकामध्ये थांबणार आहे.

मध्य रेल्वे ट्वीट

दरम्यान अनेक जण नाशिक जवळून नेहमी नोकरी, उद्योग धंद्यांसाठी ये- जा करत असतात. दरम्यान त्यांच्याकडून मासिक पास धारकांसाठी विशेष कोच असवा अशी देखील मागणी केली जात होती. दरम्यान सध्याच्या नियमांनुसार, मध्ये रेल्वेने मासिक पास धारकांना नाशिक-मुंबई नाशिक प्रवास करणार्‍यांसाठी 90 रूपये आरक्षण शुल्क आहे.

सध्या या मुंबई- मनमाड स्पेशल ट्रेनमध्ये 17 सेकंड क्लास सिटिंग आणि 3 एसी चेअर कार आहेत. मात्र केवळ कंफर्म तिकीट घेतलेल्या प्रवाशांनाच या ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा आहे. कालपासून तिकीट आरक्षण केंद्र आणि आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर तिकीटं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.