CSMT Bridge Collapse प्रकरणी अटकेत असलेले नीरजकुमार देसाई यांना जामिन नामंजूर
14 मार्च दिवशी संध्याकाळी सीएसएमटी परिसरातील पूल कोसळला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर 32 लोकं जखमी होते.
मुंबईतील सीएसएमटी परिसरातील टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंगकडे स्टेशंवरून जाणार्या पादचारी (FOB)पूलाचा भाग कोसळल्यानंतर पालिकेकडून आता कामचुकार अधिकार्यांवर बडगा उचलला जात आहे. या प्रकरणामध्ये अटकेत असलेले स्ट्रचरल ऑडिटर (Structural Auditor) नीरजकुमार देसाई (Neeraj Desai) यांना आज जामिन नाकारण्यात आला आहे.
ANI ट्विट
पोलिसांच्या अहवालानुसार, ऑडिटची जबाबदारी नीरज देसाई यांची कंपनी डीडी देसाई असोसिएट इंजिनियरिंग कन्सल्टंट अॅन्ड अॅनालिस्ट प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांच्याकडून ऑडिट रिपोर्ट देण्यात आला होता. त्यामध्ये पूल सुस्थितीत असल्याचं म्हटलं होतं. पूलाच्या ऑडिटमध्ये बेपरवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक करण्यात आली आहे.
14 मार्च दिवशी संध्याकाळी सीएसएमटी परिसरातील पूल कोसळला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर 32 लोकं जखमी होते. याप्रकरणामध्ये तीन पालिका अधिकारी अटकेत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)